Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
पुढील काही महिन्यांत

गदिमायन

 

गदिमांच्या बहुरंगी आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेबद्दलच्या पोटभर गप्पा आणि साथीला त्यांची लोकप्रिय असणारी भावगीते , लावण्या आणि गीतरामायण म्हणजे गदिमायन ! गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया , अमेरिका आणि गल्फमधे गदिमायनाचे अठ्ठावीस प्रयोग आनंदजींनी सादर केले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला . कॅलिफोर्नियातील सान होजे इथल्या कार्यक्रमाला तर सव्वा हजार मराठी रसिकांची उपस्थिती होती . तुम्ही "गदिमायन" ह्या शब्दावर गुगल सर्च केलत तर गेल्या वर्षीच्या गदिमायनाच्या परदेशातील कार्यक्रमांची इत्यंभूत माहिती मिळू शकेल . .

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo