Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
पुढील काही महिन्यांत

दौरा अमेरिकेचा

 

नमस्कार ! मी सध्या अमेरिकेत आहे.मी राहातो त्या ओहायो राज्यात अजूनतरी कडाक्याच्या थंडीला सुरूवात झालेली नाही. कोवळं उन , गुलाबी थंडी आणि घनदाट झाडीच्या नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून फिरायला जाताना कधी सूर्याची ममताळू उब तर कधी वार्‍याची गारसर झुळूक तनामनाला सुखवून जाते. फिरायला आलेली माणसंसुद्धा " वा: आज दिवस फारच छान आहे बुवा ! अशा अर्थाचं एखादं वाक्य बोलल्याखेरीज पुढे सरकत नाहीत .
सध्या ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दोन कार्यक्रम करायचे आहेत. पाच ऑक्टोबरला न्यूयॉर्कला आणि पंधरा नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे ! गदिमायनच सादर करणार आहे .रामकथा सांगायचा योगही अर्थातच कधीतरी येइल.
मी सध्या माझे साडू भास्कर मराठे यांच्याकडे उतरलोय ! पवईच्या आय. आय. टी. चे पदवीधर असणारे भास्कर इथल्या "लुक " नावाच्या मोटारींचे डिझाइन तयार करणार्‍या कम्पनीत चीफ डिझायनर म्हणून काम करतात .
माझा अमेरिकेतील संपर्क क्रमांक :३३०-६६५-२३४२, भ्रमणध्वनी ३३०-२३४-०९२७

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo