Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 

गदिमा

गदिमांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने!
  १ ऑक्टोबर २००८. 
आज तारखेनं गदिमांचा एकोणनव्वदावा जन्मदिवस ! या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! तसं पाहिलं तर गदिमा आपल्यातून देहानं गेले त्यालासुद्धा आता तीस वर्षं होउन गेली , तरीसुद्धा आज , भारताच्या , जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या मराठी माणसाच्या मनातलं गदिमांचं स्थान होतं तसंचकायम आहे . आजही त्यांच्या चित्रपटगीतांचे कार्यक्रम गावोगावची तरूण मुलं मुली सादर करतात , मंदिरामंदिरातून उठणारे गीतरामायणाचे सूर भक्तीभावना जागती ठेवतात , याचं रहस्य कशात असेल?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलंय त्या " जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर त्या सार्‍याचा आढळ तुम्हाला गदिमांच्या लेखनात त्यांच्या काव्यात मिळतो . काळ बदलतो आहे हे तर खरंच ! काळाबरोबर माणसानंही बदलायचं असतं . आपल्या मराठी समाजाचंच पहाना , पन्नास वर्षाच्या काळात मराठी माणूस केव्हढातरी बदलला . आपापल्या खेड्यात , त्यावेळी छोटेखानी असणार्‍या शहरात अगदी साधं आयुष्य शांतपणे जगणारा मराठी समाज आता विजिगिषु वृत्तीनं सागरपार पोहोचला आहे . आपल्या बुद्धीमत्तेनं नवीनवी क्षेत्रं काबीज करतो आहे . " अंथरूण पाहून पाय पसरणार्‍या मराठी माणसाचं अंथरूण आता अवघ्या विश्वात पसरतं आहे . कवी केशवसुतांनी हे भविष्य केंव्हाच करून ठेवलं आहे .
नवा शिपाई नावाच्या त्यांच्या कवितेत केशवसुत म्हणतात
" खादाड असे माझी भूक ! ,
चतकोराचे मला न सुख ,
कूपातिल मी नच मंडूक ,
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे !
कोण मला वठणीला आणो शकतो ते मी पाहे !
आजच्या मराठी माणसाची विजिगिषु वॄत्ती पाहून स्वतंत्र्यवीर सावरकरांना विलक्षण समाधान वाटलं असत.

वेबसाईट सुरू झाल्याला आता जवळजवळ दोन महिने होत आले . या दिवसात तुम्ही या वेबसाईटला भेट दिलीत , " सामिल झालात , प्रेमानं सूचना केल्यात खूपखूप आभारी आहे मी तुमचा . पण हा सिलसिला इथेच थांबता कामा नये . तुम्ही वारंवार आलं पाहिजे , माझ्याबरोबर गदिमांच्या साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे . हवं नको ते हक्कानं मला सांगितलं पाहिजे . आता तर कुठे सुरूवात आहे . या साहित्यराजाच्या घरी रोज दिवाळी असणार आहे
 
 
 
 
Anand Madgulkar Logo