Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे सूर

व्यंकटेश माडगूळकरांच्या करीअरच्या अगदी सुरूवातीच्या काळातली एक गमतीशीर गोष्ट !

  प्रख्यात हिंदी हास्याभिनेता मास्टर भगवान यांच्याकरता व्यंकटेश माडगूळकर म्हणजेच आमचे तात्या एक पटकथा लिहीत होते. माझ्या आठवणीप्रमाणे त्या चित्रपटाचे नाव " भागमभाग असावे. भगवानदादांच्या सायनच्या विष्णू स्टुडियोतील वरच्या मजल्यावरच्या एका खोल्रीत तात्यांचे हे लिखाण चाले. मुळातच मुंबईत उकाडा जास्त आणि वरच्या मजल्यावर उकडहंडी झाली म्हणजे तात्या वैतागत आणि लिखाण थांबवून खालच्या मजल्यावर असणार्या शूटींग फ्लोअरवर येत. तिथं कुठलं ना कुठलंतरी चित्र्रीकरण चालल्रेलं असे ते थोडावेळ बघत बसत आणि मग पुन्हा वर जाउन कामाच्या रगाड्याला जुंपून घेत. एक दिवस असेच ते खाली आले तर भगवानदादांचे धाकटे बंधू शंकरराव पालव एका स्टंट सीनचे शूटींग करण्यात गर्क होते. सेटवर आग लावलेली होती , सोडा वॉटरच्या बाटल्यांची फेकाफेकी चालू होती . जळते ड्रमस इकडून तिकडे गडगडत जात होते . या बॅकग्राउंडवर गुंडांचं धमाल ढिशॉ ढिशॉ फाईटिंग चालू होतं. तात्या थोडावेळ गमतीन हा प्रकार न्याहाळत राहिले आणि मग सहज त्यांनी शंकरराव पालवांना विचारलं " कौनसी पिक्चरका शूटींग हो रहा है?

हिंदीत लेखकाला आदरानं दादा म्हणण्याची पद्धत आहे तसं शंकरराव पालव आदरानं म्हणाले , दादा ! आपकेही पिक्चरका !

आता थ:क्क होण्याची पाळी तात्यांची होती .

अछ्छा ? लेकिन मेरी कहानी मे ये सब नही है !

लेकिन बाद मे तो लगेगा ना ? अभीसे ले के रखते है ! शंकररावांनी नम्रपणे उत्तर दिले.

यावर बिचारे तात्या काय बोलणार ? काहीही न बोलता शांतपणे ते वरच्या मजल्यावरच्या आपल्या खोलीकडे चालू लागले.
   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo