Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 

माझे सूर

घरचा वानवळा
 

अलीकडे खेड्यात फारसं जाणं होत नाही. पण इतकी वर्ष झाली तरी तिथल्या काही चालिरीती अजूनही पक्क्या ध्यानात आहेत. माडगूळला गेल्यावर तिथला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रोज निरनिराळ्या शेतकरी मंडळींकडे चहाला जाणं. आम्ही मुलं गावाकडं जायचो तो काळ पन्नास ते साठच्या दशकातला मंडळी गुळाचा चहा करायची आणि आग्रहानं पाजायची. वर विचारायची " गोड झालाय नव्हं? आणि निघताना स्वतःच्या मळ्यात पिकलेलं काहीबाही आग्रहानं बरोबर द्यायची मग कधी उसाची मोळी, कधी भुईमुगाच्या ओल्या शेंगा तर कधी तर कधी कोवळ्या हरबर्‍याचे डहाळे! याला म्हणायचं घरचा वानवळा!

आमच्या परिवारातील गदिमांचं आणि व्यंकटेशतात्यांचं खूप नाव झालं पण इतरांमधेही हे बीज थोडं थोडं विखुरलेलं होतंच! या सदरात तुम्हाला अंबादास माडगूळकरांच्या कविता, व्यंकटेशतात्यांच्या लेखणीतून उतरलेली गीतं ( होय! गीतंच!) असा घरचा वानवळा मनमुराद चाखायला मिळेल.

 
क्रम लेख
१.
व्यंकटेश माडगूळकरांच्या करीअरच्या अगदी सुरूवातीच्या काळातली एक गमतीशीर गोष्ट !
 
 
Anand Madgulkar Logo