Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे सूर

ऐकशील का रे माझे, अर्थहीन गीत दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत ! 

 

पन्नासच्या दशकात गदिमा, बाबूजी, राजाभाउ परांजपे आपापल्या परीनं जीवतोड मेहेनत करीत होते पण मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था तशी दारूणच होती. त्या सुमारास बाबूजींनी एक पिक्चर लाँच केले होते. त्याचं नाव रत्नघर ! फायनान्सची नेहेमीची बोंब असल्यामुळे ते पिक्चर मध्येच बोंबललं!  त्याची गाणी अर्थातच गदिमांची होती. मधे काही काळ गेला आणि मग लाखाच्या गोष्टीच्या कामाला सुरूवात झाली. त्यात एका विरहगीताची सिच्युएशन होती. एकदम गदिमांना आठवलं, अरे ! बाबूजीच्या पिक्चरकरता लिहिलेलं गाणं या सिच्यूएशन मध्ये अगदी फिट्ट बसेल. दिग्दर्शक राजाभाउ परांजप्यांनाही ही कल्पना एकदम पसंत पडली आणि मग सगळेच उत्साहाने बाबूजींकडे गेले. पण बाबूजी हटून बसले. ते मला : "अण्णा! हे गीत तुम्ही माझ्या करता लिहिलं आहेत. मी तुम्हाला त्याचे पैसे मोजले आहेत. मी तेर गीत मार्केट मध्ये आणीन किंवा तसेच पाडून ठेवीन ! तो माझा प्रश्न आहे ! पण मी ते तुम्हाला इथे वापरू देणार नाही !"  

झालं या मुद्द्यावरून त्यादोघांचं जोरदार भांडण झालं. शेवटी गदिमा तणतणत खोलीतून बाहेर पडले ते दहा मिनिटांनी तसेच तरातरा चालत आत आले. त्यावेळी फडके समोर हार्मोनियम घेउन काहीतरी कड्याळ जमवित बसले होते. त्यांच्या अंगावर अक्षरशः तो कागद भिरकावून ते गुरकावले " हे नवं गीत ! मी चाललो !!" आणि ते जायला निघाले सुद्धा ! आणि पुढचं साक्षात बाबूजींच्या शब्दात सांगायचं तर .. मी ही काही कमी नव्हतो. अण्णा खोलीच्याउंबर्यापर्यंत पोहोचले असतील नसतील , मी म्हटलं " थांबा ! चाल ऐकून जा ! "

अण्णा राजाभाउ , सगळेच चाल ऐकायला जमले. बाबुजींनी त्यांच्या मधाळ आवाजात गायला सुरूवात केली. आणि काय आश्चर्य ! काही क्षणांपूर्वीच संतापलेल्या गदिमांच्या डोळातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मराठीतील एक अजरामर विरहगीत जन्माला आल  होतं.

                              ऐकशील का रे माझे, अर्थहीन गीत

                              दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत !  

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo