Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे शब्द
स्व. तात्यासाहेब केतकर -- महिन्याचा पूर्ण पगार
 

स्व. तात्यासाहेब केतकर हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनन्य भक्तांपैकी एक ! श्री महाराजांनी देह सोडल्यावर अनेक वर्षांनी ते तात्यासाहेबांच्या मुखातून बोलू लागले . मुंबईतल्या मालाड उपनगरात ते रहात असत. आपल्या घरात असणार्‍या एका लाकडी पेटीवर ते बसत आणि मग त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा श्री महाराजांचा असे . श्रद्धाशील माणसं नामस्मरणाविषयी विचारविनिमय करायला त्यांच्याकडे आवर्जून त्यांच्याकडे जात असत.
मंडळी त्यांना भेटायला गेली . त्यांची तक्रार नेहेमीचीच होती .

महाराज ! नामस्मरण करताना चित्त एकाग्र होत नाही याला काय करावे ?

केतकरमहाराज किंचित हसून म्हणाले " एकाग्रता वगैरे फार पुढच्या गोष्टी आहेत ! मला सांगा , तुम्ही मंडळी करता काय?

आम्ही डिफेन्स अकाउंटमधे नोकरीला आहोत.

" वा वा छान ! मग महिन्याचे तीस दिवस अगदी डटून काम करत असाल !"

नाही नाही ! रविवारच्या चार सुट्ट्या असतात ना ! मंडळी थोडी संकोचून म्हणाली !

ठिक आहे ! मग निदान पंचवीस दिवस तरी पूर्ण काम होत असेल .

"" नाही हो महाराज ! कसल्याकसल्या सुट्ट्या असतात . वीस बावीस दिवस काम होत असेल जेमतेम ! त्यांच्यापैकी एक थोडेसे लाजूनच म्हणाले .

जाउंद्या ! गेला बाजार बावीस दिवस तरी तुम्ही अगदी आठ तास राबत असणार ! हो ना?

नाही महाराज ! रोज आठ तास काम नाही होत !

का?

चहापाणी .. गप्पाटप्पा .. मधूनच कोणतरी काहीतरी विकायला येतं . पुन्हा जेवायची सुट्टी !जेमतेम चारपाच तास काम होत असेल !

सगळे चांगलेच गोंधळले होते . महाराजांचा रोखच कुणाच्या लक्षात येत नव्हता !

बघा ! म्हणजे इतकं कमी काम करता . महाराज मिश्किलपणे हासून म्हणाले . " आणि पगार मात्र अगदी पूर्ण ! महिन्याच्या महिन्याला अगदी स्टँप लावून घेता . खरं कि नाही?

होय महाराज ! आलेली मंडळी लाजेनं अगदी चकणाचूर होउन गेली होती !

" अरे नामस्मरणाचंही अगदी तसंच आहे . ते नुसतं करा , बसून करा झोपून करा कसंही करा पण करा ! तुम्हाला महिन्याचा पूर्ण पगार मिळाल्यावाचून रहाणार नाही . महाराजांनी प्रेमानं सांगितलं !

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo