Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे शब्द
नाम घेता
 

ब्रम्हचैतन्य महाराज श्री गोंदवलेकरांचे सद्गुरू श्री तुकामाई हे खरंतर श्री पांडुरंगाचे निस्सीम भक्त ! पण त्यांनी श्री महाराजांना श्रीरामाची उपासना करायला सांगितलं आणि श्रीराम जयराम जयजयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह सामान्य प्रापंचिकांना द्यायचा अधिकार दिला. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराज आयुष्यभर नामाविषयीच बोलत राहिले. माझ्या आयुष्यातल्या एका भाग्ययोगामुळे मी श्री महाराजांच्या जवळ आलो आणि मग त्यांचाच होउन गेलो. श्री ब्रह्मचैतन्यांविषयी  त्यांच्या एका भक्तानं लिहिलंय ..

                                 जो जाई एकवार, तो विसरे घरदार ! त्यासी देई नामसार ऐसा नाही पाहिला .

सद्गुरूंच्या नामविचारांचं सार तुम्हाला नाम घेता या सदरात वाचायला मिळेल.

 
क्रम लेख
१.
स्व. तात्यासाहेब केतकर -- महिन्याचा पूर्ण पगार
 
 
Anand Madgulkar Logo