Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
गीतरामायणाचे रामायण

भाग ५...

 

ज्ञानपीठविजेते कवी कुसुमाग्रज हे तर गदिमांच्या चित्रपटगीतांचे निस्सीम चाहते . गीतरामायणाचा प्रारंभ झाल्यावर त्यांनी लिहिलं ," गदिमांची प्रतिभा आता सर्व महाराष्ट्रात परिमळली आहे .. घराघरातील अंतःकरणे त्यांच्याप्रतिभेने काबीज केली आहेत. हे सारं घडलं त्यांच्या अप्रतिम भावकाव्यामुळेआणि गीत रामायणामुळे !.माडगूळकर हे मराठी भावगीताचे जन्मदाते आणि प्रणेतेही आहेत.त्यांच्यापूर्वी भावगीते लिहिली गेली नव्हती असे नाही,पण भावगीत हा अभिजात काव्याचाच एक प्रकार असतो हे माडगूळकरांनीच प्रथमतः सिद्ध केलं . आपल्या शताधिक गीतांनी भावगीत या प्रकाराला साहित्यिक प्रतिष्ठा मिळवून दिली . मराठी रसिकांचे प्रेम मिळवून दिले .रसिकहो ! कविवर्य कुसुमाग्रजांचा गदिमांविषयीचा अभिप्राय आपण ऐकलात आणि आता ऐकूया बाबुजींच्याच आवाजातलं , मूळ गीतरामायणातलं हे गीत .       

गीत रामायणाच्या पुस्तकालासुद्धा आता धर्मग्रंथाचं पावित्र्य प्राप्त होउ लागलं आहे प्रसिद्ध साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी याबाबतीतला एक मजेशीर अनुभव सांगितला आहे . प्रारंभीच्या काही वर्षात पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात बाबूजी दरवर्षी नियमानं कार्यक्रम करीत असत. येणारे श्रोतेही नेहेमीचेच आणि मुरलेले असत. त्यांना गीतरामायण तोंडपाठ असे. द. मा. अशा एका कार्यक्रमाला उपस्थित होते . असंख्य श्रोत्यांना श्रवणाबरोबर पुस्तकाचे वाचन करताना पाहून सहज द. मां नीही एका वयस्क स्त्रीकडे पुस्तक मागितले . पुस्तक मिळाले ,पण " खाली ठेवू नका हं या विनंतीवजा इशार्‍याबरोबर .कार्यक्रम ऐकण्याच्या नादात द. मां नी अभावितपणे ते पुस्तक खाली ठेवले त्याबरोबर ते पुस्तक लगेच उचलून घेत त्या बाई म्हणाल्या "बघा ! शेवटी ठेवलतंच ना ते खाली? थोडसं ओशाळण्याबरोबरच खूपसा आनंद द. मां. च्या मनाला स्पर्शून गेला . हाच अनुभव अनेकांचा असणार . होय ना ?

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo