| |
 |
पुढील काही महिन्यात |
|
| |
न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे , निवास : ३३०-६६५-२३४२ भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
|
| |
|
अधिक माहिती >> |
|
|
|
 |
गीतरामायणाचे रामायण |
|
| |
गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा
जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले
गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत . |
| |
पुढे वाचा >> |
|
 |
|
|
|
|
|
गीतरामायणाचे रामायण |
| माझे शब्द >>
गीतरामायणाचे रामायण >> भाग ४ |
 |
 |
भाग ४...
|
|
| |
मी रामायण ! आज तुम्हाला गदिमांच्या लेखनप्रक्रियेविषयी
सांगायचंय .त्यांची लेखनाची प्रक्रिया अगदी वेगळी होती . त्यांच्या प्रतिभेच्या
चमत्काराच्या अनेक कथा प्रचलित असल्या तरी ते नेहेमी म्हणत कि विचारांची
प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज मी कधीही कागदाला पेन लावीत नाही . आणि मग एकदा ही
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आनंदित होउन ते म्हणत " बस ! अब खाली लिखनेका है !
या अशा पूर्वनियोजित विचारामुळेच त्यांच्या लेखनात कधीच फारशी खाडाखोड नसे.
एखाददुसरा शब्द इकडचा तिकडे केला असेल तेव्हढंच ! योगायोगानच आज ज्या गीताविषयी आपण
बोलतो आहोत त्या गीताची मूळ संहिता पाहण्यात आली आणि त्यात एक अतिशय गमतीशीर
गोष्ट आढळली , संपूर्ण गीत लिहून झाल्यावर बहुदा कविराजांना " लाडके कौसल्ये
राणी ही ओळ सुचली असावी . कारण गीताच्या बाजूला एक मोठा सूर्य काढून त्यात
त्यांनी ही ओळ लिहिली आहे आणि त्या सूर्याचे किरंण प्रत्येक कडव्याच्या शेवटापर्यंत
पोहोचवले आहे . गदिमांच्या लेखणीचे हे विभ्रम मला तर संमोहित करतात
.तुम्हालाही करत असतील . खरं कि नाही?
गदिमांच्या मनात रामप्रीतीचा अंकुर कसा निर्माण झाला हे आपण
गेल्या भागात पाहिले . या अंकुराचे पुढे रोपट्यात रूपांतर झाले तो दिवसही
योगायोगाने रामनवमीचाच होता .आणि सुमारही होता दुपारी बारा वाजण्याचाच !
|
| |
|
| |
Printable Version |
|
|
 |
|
| |
|
|