| |
 |
पुढील काही महिन्यात |
|
| |
न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे , निवास : ३३०-६६५-२३४२ भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
|
| |
|
अधिक माहिती >> |
|
|
|
 |
गीतरामायणाचे रामायण |
|
| |
गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा
जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले
गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत . |
| |
पुढे वाचा >> |
|
 |
|
|
|
|
|
गीतरामायणाचे रामायण |
| माझे शब्द >>
गीतरामायणाचे रामायण >> भाग २ |
 |
 |
भाग २...
|
|
| |
नमस्कार ! मी गीत रामायण ! गेल्या पन्नाससाठ वर्षात या
महाराष्ट्रानं केलेलं कौतुक...आठवणी काळजात साठवल्यात मी !तो अक्षय आनंदाचाठेवा आहे
माझा या निमित्तनं तुम्हाला सांगणारंय सगळं . खूप वर्षांपूर्वीची गोष्ट !
बाबुजींनी कार्यक्रम करायला नुकतीच सुरूवात केली होती . त्यावर्षी मृत्यूंजय
दिनानिमित्त स्वातंत्यवीर सावरकरांचे पुण्यामुंबईत सत्कार होत होते .
पुण्याच्या नगरवाचन मंदिरात बाबूजींनी त्यांच्या अत्यंत भावपूर्ण आवाजात " सागरा
प्राण तळमळला सादर केलं . सत्कार समारंभ संपल्यावर सावरकर बाबूजींना
म्हणाले "तू माझं हेच गीत दोन्ही वेळा गायलंस , पण मला तुझं गीतरामायण ऐकायचंय
! मग रात्रीच्या शिवाजी मंदिरातल्या सत्कारात सावरकरांच्या समोर बाबूजी गायले
. आणि तुम्हाला सांगतो " दैवजात दु:खे भरता ऐकताना त्या स्वातंत्र्यवीराच्या
डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. गीत संपल्यावर बाबुजींच्या पाठीवरून हात फिरवत
सावरकर गहिवरून म्हणाले " कुणाचं अधिक कौतुक करू? तुझं कि माडगूळकरांचं ?
तुम्हाला सांगतो, त्या थोर स्वातंत्र्यवीराच्या या उदगारात मला सारं काही मिळालं .
गेल्या भागात , गदिमांना झालेल्या साक्षात्काराविषयी
मी आपल्याला सांगितलं . गदिमा नेहेमी म्हणायचे कि प्रभू रामचंद्रानं माझ्याकडून
गीतरामायण लिहून घेतले याचं बीजमाझ्या आईनं तिच्या श्रद्धाशील वृत्तीनं लहानपणीच
माझ्या मनात रोवलं असावं.त्यांचा एक मामा रामदासी होता . वयाच्या अठराव्या
वर्षी जो रामदासी बनून तो घराबाहेर पडला .तो तब्बल एका तपानं म्हणजे
बारा वर्षांनी घरी परत आला . स्वतःला विसरून तासंतास तो रामाची पूजा करीत असे
आणि गदिमा ती अनिमिष नेत्रांनी न्याहाळत असत . पुढे हा मामा पुन्हा घरातून निघून
गेला आणि त्यानंतर त्याची आणि गदिमांची कधीच गाठ पडली नाही . या त्यांच्या
मामाच्या पाहिलेल्या रामभक्तीमुळे त्यांच्या मनातल्या रामप्रीतीच्या बीजाला
अंकुर फुटला असं गदिमांना प्रामाणिकपणे वाटायचं.
|
| |
|
| |
Printable Version |
|
|
 |
|
| |
|
|