Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे शब्द
भाषांमाजी भाषा मराठीया
 

आपण सर्व मराठी आहोत. मराठी ही आपली मातृभाषा आहे . जन्माबरोबर माणसाला काही गुण परंपरेने मिळतात . आपण भाग्यवान अशा अर्थानं कि जन्माबरोबर आपल्याला श्री शिवाजीमहाराजांबद्दलचा जाज्वल्य अभिमान लाभला.

कानड्या विठ्ठलाची , वक्रतुंड गणरायाची आणि मराठमोळ्या खंडेरायाची भक्ती लाभली . तुळजाभवानीची शक्ती लाभली .

पहिल्या बाजीराव पेशव्याची महत्त्वाकांक्षा लाभली . नाना फडणिसांचं चातुर्य लाभलं , शाहू फुले आंबेडकरांचं द्रष्टेपण लाभलं

  ज्ञानोबातुकोबांच्या प्रतिभेनं आपण फुलारलो तर मोरोपंतांच्या आणि वामनपंडिताच्या पांडित्यानं आपण दिपून गेलो .

लोकशाहिर रामजोशी आणि अनंत फंदीच्या शृंगारकवनांनी आपण बेभान झालो तर परशुराम आणि पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांनी आपण हरखून गेलो . 

बालकवी ठोंबर्‍यांच्या फुलराणीनं आपण उमललो तर केशवसुतांच्या तुतारीन  आपल्याला उगवत्या काळाचं भान दिलं . 

गदिमांच्या प्रतिभेवर आपण कौतुकाची फुलं मनसोक्त उधळली . तरआचार्य अत्र्यांच्या आणि पुलंच्या विनोदानं आपण खळखळून हासलो .  केशवराव भोसले आणि बालगंधर्वांचं आपण मनसोक्त कोडकौतुक केलं तरव्ही शांताराम आणि मास्टर विनायकांच्या अजरामर चित्रपटकलेला आपण डोक्यावर घेतलं . मराठी माणसाच्या अजोड गुणग्राहकतेची अशी किती उदाहरणं सांगावीत ? 

हे सारे गुणीजन आपल्या मायमराठीच्या अंगाखांद्यावर वाढले . मराठीच्याच आधारानं या सार्यांचा वेलू गगनावेरी गेला .

या सार्यांचं कर्तृत्व मराठीमुळं झळकून उठलं कि या सार्‍यांमुळे आपल्या मातृभाषेचं वैभव वाढलं ? खरोखर " कवणे कवणा अलंकारिले ? असाच प्रश्न हा !  तर या सार्यांनी वाढवलेल्या मराठी भाषेच्या वैभवाची आणि मराठी भाषेमुळे नावारूपाला आलेल्या या सार्यांची ओळख करून घेउया " भाषांमाजी भाषा मराठिया " या लवकरच सुरु होणार्‍या सदरात !

 
 
 
Anand Madgulkar Logo