Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे शब्द
आठवणी अवघ्या महाराष्ट्राच्या...
 

एकदा मी पुण्याहून मुंबईला डेक्कनक्वीनने निघालो होतो. शेजारच्या जागेवर एक गृहस्थ येउन बसले . ओळखपाळख झाली आणि मग भल्या गप्पा रंगल्या. तो गृहस्थही मोठा रसिक, उत्तम वाचन असणारा असा निघाला. मी माडगूळकर हे कळल्यावर अनिवार्यपणे गदिमांवरच्या गप्पा रंगल्या. त्या गृहस्थाचे नावगाव कळल्यावर माझा आदर आणि कौतुक आणखीनच वाढले कारण तो अस्खलितपणे गीतरामायणाबद्दल बोलत होता, सीतास्वयंवरातील गाणी त्याला मुखोद्गत होती.

इतकंच नव्हे तर तर गदिमांनी भाषांतरित केलेल्या अथर्वशीर्षातील काही ओळी त्याने पाठ म्हणून दाखवल्या. भिवंडीच्या एका महाविद्यालयात तो गृहस्थ प्राध्यापक होता आणि धर्माने मुस्लिम होता . मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.

दादर कधी आलं ते कळलं सुद्धा नाही. मीही गदिमांच्या आठवणीत नुसता बुडून गेलो होतो. गाडी थांबली तेंव्हा मात्र आम्ही उतरण्यासाठी उठलो. जाताजाता तो गृहस्थ एक असं वाक्य बोलला जे माझ्या काळजात आजवर जनू घर करून बसलं आहे. तो म्हणाला॑ " माडगूळकर! गदिमांबद्दलच्या या आठवणी तुम्ही लिहून काढल्या पाहिजेत निदानपक्षी रेकॉर्ड तरी करून ठेवल्या पाहिजेत. कारण या आठवणी आता तुमच्या एकट्याच्या नाहीत. त्या अवघ्या महाराष्ट्राच्या आहेत. तुमच्याबरोबर त्या आठवणीही जाता उपयोगी नाहीत.

खरं सांगायचं तर त्या गृहस्थाचम हे वाक्य माझ्या या सार्या वेबसाईटच्या खटातोपाचम मूळ कारण आहे.   

   
  Print Printable Version
 
 
 
Anand Madgulkar Logo