Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
गदिमांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने!
   १ ऑक्टोबर २००८. आज तारखेनं गदिमांचा एकोणनव्वदावा जन्मदिवस ! या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! तसं पाहिलं तर गदिमा आपल्यातून देहानं गेले त्यालासुद्धा आता तीस वर्षं होउन गेली , तरीसुद्धा आज , भारताच्या , जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या मराठी माणसाच्या मनातलं गदिमांचं स्थान होतं तसंचकायम आहे . आजही त्यांच्या चित्रपटगीतांचे कार्यक्रम गावोगावची तरूण मुलं मुली सादर करतात , मंदिरामंदिरातून उठणारे गीतरामायणाचे सूर भक्तीभावना जागती ठेवतात , याचं रहस्य कशात असेल?...
पुढे वाचा >>
आणि मनात आले
  ७०-७२ साल असेल. आम्ही, नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या तरूण पोरांनी जिप्सी नावाचे एक मासिक सुरू केले होते . मी त्यावेळी मुंबईत होतो . व्ही. जे. टी आय नावाच्या एका प्रख्यात संस्थेत "लोकर " या विषयावरचा एक डिप्लोमा कोर्स करत होतो . हा कोर्स मी का करत होतो हा मला अजूनपर्यंत न सुटलेला एक प्रश्न आहे , कारण त्यानंतर हिवाळ्यात लोकरीचा स्वेटर घालणे या व्यतिरिक्त त्या विषयाशी माझा पुन्हा संबंध आला नाही . असो ! तर त्यावेळी जिप्सीसाठी जाहिराती मिळविण्याचे कांम मी फावल्या वेळात करीत असे ....
पुढे वाचा >>
गाणी आणि आठवणी
  पन्नासच्या दशकात गदिमा, बाबूजी, राजाभाउ परांजपे आपापल्या परीनं जीवतोड मेहेनत करीत होते पण मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था तशी दारूणच होती. त्या सुमारास बाबूजींनी एक पिक्चर लाँच केले होते. त्याचं नाव रत्नघर ! फायनान्सची नेहेमीची बोंब असल्यामुळे ते पिक्चर मध्येच बोंबललं! त्याची गाणी अर्थातच गदिमांची होती. मधे काही काळ गेला आणि मग लाखाच्या गोष्टीच्या कामाला सुरूवात झाली. त्यात एका विरहगीताची सिच्युएशन होती. एकदम गदिमांना आठवलं, अरे ! बाबूजीच्या पिक्चरकरता लिहिलेलं गाणं या सिच्यूएशन मध्ये अगदी फिट्ट बसेल. दिग्दर्शक राजाभाउ परांजप्यांनाही ही कल्पना एकदम पसंत पडली आणि मग ...
पुढे वाचा >>
 
Anand Madgulkar Logo